
रायगड : जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून जोरदार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांमध्ये सरासरी ८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या अतिवृष्टीमुळे सावित्री आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून आसपासच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्या पात्रातून वाहत असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्हा (तालुकानिहाय आरएफ) दि. 26.07.2025(मिमी)
सकाळी 8:00 पर्यंत
अलिबाग- 41.00
मुरुड- 15.00
पेन- 92.00
पनवेल- 93.8
उरण- 20.00
कर्जत- 114.7
खालापूर- 92.00
माथेरान- 201.00
रोहा- 68.00
सुधागड- 88.00
माणगाव- 62.00
तळा- 41.00
महाड- 95.00
पोलादपूर- 145.00
श्रीवर्धन- 42.00
म्हसळा- 106.00
एकूण पाऊस – 1316.5
आजचा सरासरी पाऊस ८२.२८ मिमी