अतिवृष्टीमुळे रायगडमधील गडद प्रेक्षणीय स्थळांना जाण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लागू

ॲकर- रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवधार/पर्यटन स्थळांवर नागरिक आणि पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, तसेच त्याठिकाणी होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका टाळण्यासाठी १५ जुलै २०२५ पर्यंत रायगड किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष किशन न. जावळे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हा आदेश काढला असून, उपविभागीय अधिकारी महाड यांच्या अहवालाच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली आहे.
या आदेशानुसार गडद भागात पायवाटेने जाणाऱ्या मार्गांवरून पर्यटकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
- १५ जुलै २०२५ पर्यंत रायगड किल्ल्यावर प्रवेश बंदी.
- दरड कोसळण्याचा संभाव्य धोका ओळखून प्रतिबंधात्मक उपाय.
- नागरिक व पर्यटकांनी सहकार्य करावे, प्रशासनाची विनंती.
जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी पुढाकार घेतला असून, याचे पालन न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई होणार आहे.