पुण्यात नवरात्रोत्सवात घडली धक्कादायक घटना; तरुणाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण

0
25

पुणे : नवरात्र उत्सवात सर्वत्र देवीची पूजा, जागर, तसेच कर्तृत्ववान महिलांचा गौरव होत असताना पुण्यात मात्र धक्कादायक घटना घडली आहे. सातारा रोडवरील के. के. मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर एका तरुणाने तरुणीला उघड्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तरुण-तरुणीमध्ये आधी वाद झाल्याचे दिसत आहे. वाद चिघळताच तरुणाने संतापाच्या भरात तरुणीला कानशिलात लगावून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार रस्त्यावर घडल्याने पाहणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. अशा शहरात महिलांवर उघड्यावर होणारी मारहाण चिंताजनक असल्याचे नागरिक म्हणत आहेत. सण-उत्सवाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here