रायगडमधील शाळांना (दि.19) सुटी जाहीर

0
8

रायगडा (खास प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात हयातील शाळा महाविद्यालये उद्या मंगळवारी (दि. 19) बंद राहणार आहेत. रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. कि शन जावळे यांनी याबाबतचे परीपत्रक जारी केले आहे. मुसळधार पावसाची शक्‍यता लक्षात घेवून रायगड जिल्‍हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

हवामान खात्‍याने आज आणि रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्‍यामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले होते. अंबा, सावित्री कुंडलिका या नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. दुपारी शाळांमध्‍ये जाणारया विद्यार्थ्‍यांना या पावसाचा फटका बसला. त्‍यामुळे दुपारनंतर अनेक ठिकाणी शाळांना सुटी देण्‍यात आली. उद्या मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे. त्‍यामुळे खबरदारीचा उपाय म्‍हणून जिल्‍हयातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, व्‍यवसाय प्रशिक्षण संस्‍था यांना सुटी देण्‍यात आली आहे. मात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कामावर यावे लागणार आहे असे जिल्‍हाधिकारी यांनी जारी केलेल्‍या परीपत्रकात नमूद करण्‍यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here