अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अॅड. प्रवीण ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून, येथे शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे. या पुरोगामी विचारधारेला पुढे नेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
महायुती सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात शेती, पर्यटन, मासेमारी, पायाभूत सुविधा, महिला व बालकल्याण क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून विकासाचे कार्य वेगाने सुरू आहे. विशेषतः अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यांचे जतन, पर्यावरण रक्षण, रोजगारनिर्मिती, रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
अॅड. ठाकूर यांच्या प्रवेशामुळे अलिबागमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली असून, येथील राजकीय समीकरणांमध्येही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत, त्यांना सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक सलोखा आणि लोकहिताची कामं यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.