
अँकर – पालकमंत्री नसल्याने रायगड जिल्ह्याच्या विकासकामांवर परीणाम होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. जिल्ह्याला पालकमंत्री असणे आवश्यक आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय झाला पाहिजे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नियोजन समितीसह विवि ध कमिट्यांचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा, वेगवेगळे प्रश्न हे विषय पालकमंत्री हाताळतात. यात कुठंतरी अंतर पडल्याचे तटकरे म्हणाले.