अलिबाग (प्रतिनिधी): चौलच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊळ यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. “राजकारण नव्हे, समाजकारण हेच माझे ध्येय” या स्पष्ट भूमिकेसह ते चौल मतदारसंघातून जनसेवेसाठी उमेदवारी करत आहेत. विकासाचा ठोस अजेंडा घेऊन त्यांनी चौलमध्ये रणशिंग फुंकले असून, त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सचिन राऊळ हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सक्रिय आहेत. स्थानिक प्रश्नांची जाण आणि लोकांशी असलेला थेट संवाद ही त्यांची ओळख आहे. चौल परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच महिला सक्षमीकरण यावर त्यांचा विशेष भर आहे.
“चौलचा विकास हा कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसला पाहिजे,” असे मत व्यक्त करत राऊळ यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचा संकल्प व्यक्त केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकास आणि जनसेवा यांनाच प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्धार आहे.
स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि विश्वासाच्या जोरावर सचिन राऊळ यांनी निवडणुकीत उतरून चौलच्या विकासाची नवी दिशा ठरवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.



