पेणमध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये उंदराने दरवाजा उघडल्याने झाला गोंधळ !

0
17

पेण (किरण बांधणकर): पेण मधील के ई एस स्कुल मध्ये नगरपालिका निवडणुक मतदाना नंतर मत पेट्या स्ट्रॉंग रूम बनवून पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देखरेख खाली ठेवण्यात आल्या होत्या शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या मत पेट्या या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज द्वारे दिसून आले या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज फोटो वायरल झाल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडून चर्चेला उलट सुलट उधान आले होते.

यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ आणि अधिकारी वर्गांने स्ट्रॉंग रूम येथे येऊन सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी पाहणी करून उंदरामुळे लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला असल्याचे सांगण्यात आले तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्येही निदर्शनात आल्या असल्याचे निवडणूक अधिकारी तानाजी शेजाळ त्यांनी माहिती देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here