ताज्या बातम्या
“मी पण पुन्हा येईन… पण कुठून येईन ते विचारू नका!” अंबादास दानवे यांचा मिश्कील टोला

मुंबई : “तुम्ही ‘पुन्हा येईन’ असं जोरात म्हणा आणि आहे त्याच पक्षातून पुन्हा या,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर अंबादास दानवे यांनी सभागृहात एक मिश्कील टोला लगावला. “मीसुद्धा फडणवीसांसारखा पुन्हा येईन, पण कुठून येईन हे विचारू नका,” असं सूचक वक्तव्य करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेचं वादळ उठवलं.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून दानवे यांचं हे शेवटचं अधिवेशन होतं. निरोप समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार, उद्धव ठाकरे, सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे आदी नेते उपस्थित होते.
दानवे यांनी आपल्या भाषणात बालपणापासून संघाशी असलेली जवळीक, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेली पहिली भेट, तडीपार नोटीसा आणि संघर्षमय राजकीय वाटचालीच्या आठवणी शेअर केल्या.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका फ्रेममध्ये आल्याने फोटोसेशनही चर्चेचा विषय ठरलं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शेजारी न बसता जागा बदलल्याचं दृश्य अनेकांचं लक्ष वेधून गेलं.